
मागील आठवडय़ात सुरू असलेल्या शेअर बाजाराच्या घसरणीला अखेर मंगळवारी ब्रेक लागला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 639 अंकांनी वधारून 78,205 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 233 अंकांनी वधारून 24,261 अंकांवर बंद झाला. निफ्टीत सर्वात जास्त वाढ ही श्रीराम फायनान्स, इंटरग्लोब एविएशन, आयशर मोटर्स, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हीकल, महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये झाली, तर सर्वात जास्त घसरण इन्पहसिस, इटरनल, भारती एअरटेल, टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये झाली. आयटी आणि ऑइल अँड गॅस सोडून बाकीच्या सर्व इंडेक्समध्ये वाढ झाली. निफ्टी मिडपॅप आणि स्मॉलपॅप इंडेक्समध्ये 2-2 टक्के वाढ पाहायला मिळाली.



























































