गोळीबार करणाऱ्या आरोपीची मानसिक स्थिती तपासा, सत्र न्यायालयाचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2023 मधील गाजलेल्या रेल्वे गोळीबार प्रकरणातील आरोपी व माजी आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंह चौधरी याला मानसिक तपासणीसाठी रुग्णालयात हलवण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले. आरोपी स्वतःचा बचाव करण्यास आणि न्यायालयीन कामकाजात सक्रिय सहभाग घेण्यास मानसिकदृष्टय़ा सक्षम आहे का, याची तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून होणे आवश्यक आहे असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे आरोपीला ठाणे येथील मानसिक रुग्णालयात दाखल करून त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.

आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, चेतन सिंह ‘व्हाईट मॅटर डिसीज’ आणि ‘बॉर्डरलाईन इन्सॅनिटी’ यांसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त आहे.यापूर्वीही त्याच्यावर ठाणे मनोरुग्णालयात उपचार करण्यात आले होते. सध्या न्यायालयात काय चालले आहे हे समजण्याच्या स्थितीत नाही, त्यामुळे त्याच्यावर उपचार होणे गरजेचे आहे.