
बॉलीवूडचा बादशहा अशी ओळख असलेला शाहरुख खान सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘किंग’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात अॅक्शन सीन करताना शाहरुख खानला गंभीर दुखापत झाली आहे. चित्रपटाच्या सेटवर त्याला ही दुखापत झाली असून पाठीला जखम झाली आहे. यामुळे या चित्रपटाच्या शूटिंगला सप्टेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे, अशी माहिती समोर आली आहे.
दुखापत झाल्यानंतर शाहरुख खान तात्काळ उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाला. त्यानंतर यूकेला पोहोचला आहे. शाहरूखची प्रकृती सध्या ठीक असून तो कुटुंबासोबत आहे. दुखापतीमुळे शाहरुखचा श्रीलंका दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. किंग चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आहेत. याआधी त्यांनी ‘पठाण’ आणि ‘वॉर’ यासारखे सुपरहिट चित्रपट केले आहेत. किंग चित्रपटात शाहरुख खानची मुलगी सुहाना खान दिसणार आहे. पहिल्यांदाच बाप-बेटी एकत्र काम करणार आहेत. शाहरुख-सुहाना शिवाय, या चित्रपटात दीपिका पादुकोण, अभिषेक बच्चन, अनिल कपूर दिसणार आहेत.