
राज्यातील सात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश आज काढण्यात आले. मुंबई पोलीस दलातील विशेष शाखेचे अपर आयुक्त शहाजी उमप यांच्याकडे नांदेड परिक्षेत्राच्या उपमहानिरीक्षकाची जबाबदारी सोपवली.
आज काढलेल्या बदलीच्या आदेशानुसार विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महाराव यांची राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे महानिरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. दत्ता शिंदे हे मीरा-भाईंदर-वसई-विरार आयुक्तालयात अपर आयुक्त असतील. संजय जाधव यांच्याकडे ठाणे शहरातील पूर्व प्रादेशिक विभागाची जबाबदारी सोपवली आहे. श्रीकांत पाठक हे ठाणे पोलिसांच्या प्रशासन विभागाचे कामकाज पाहतील. अभिषेक त्रिमुखे यांची बृहन्मुंबई अपर आयुक्तपदी बदली केली आहे. नागपूर पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेले शिवाजी राठोड यांच्याकडे मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेची जबाबदारी सोपविली आहे.