
न्यूयॉर्कच्या मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘मेट गाला 2025’ या जगप्रसिद्ध फॅशन इव्हेंटमध्ये बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने ‘किंग एण्ट्री’ केली. रेड कार्पेटवर चालताना शाहरुखच्या हातात एक छडी आणि गळय़ात खूप सारी ज्वेलरी पाहायला मिळाली. शाहरुखने रेड कार्पेटवर एण्ट्री मारताच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शाहरुख खानसोबत बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हीसुद्धा पती निक जोनससोबत दिसली. तिनेही आपल्या मनमोहक अदाकारीने सर्वांचे लक्ष वेधले.