
टाइड डिटर्जंट आणि हेड अँड शोल्डर्स शॅम्पूसारख्या घरगुती उत्पादनाचे निर्माता प्रॉक्टर अँड गॅम्बल (पी अँड जी) च्या सीईओपदी हिंदुस्थानी वंशाचे शैलेश जेजुरीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शैलेश सध्या कंपनीचे सीईओ म्हणून कारभार पाहत आहेत. 1 जानेवारी 2026 पासून ते सीईओपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. गेल्या 4 वर्षांपासून कंपनीचे नेतृत्व करणारे सध्याचे सीईओ जॉन मोलर यांची जागा घेतील, तर मोलर कंपनीच्या कार्यकारी अध्यक्षाची भूमिका स्वीकारतील.