शकीराची मुंबई- दिल्लीतील कॉन्सर्ट रद्द, 32 हजारांना विकली गेली होती तिकिटे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगप्रसिद्ध पॉप गायिका शकीराचा एप्रिलमध्ये होणारी ‘फीडिंग इंडिया कॉन्सर्ट’ सध्या पुढे ढकलण्यात आली आहे. आयोजकांनी सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि इराण-इस्रायल युद्धाची परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. कॉन्सर्टच्या नवीन तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. शकीरा मुंबईत 10-11 एप्रिल रोजी आणि दिल्लीत 15 एप्रिल रोजी कार्यक्रम सादर करणार होती. ती 2007 नंतर पहिल्यांदाच हिंदुस्थानात येणार होती. तिच्या मुंबईतील कॉन्सर्टचे तिकीट 32 हजार रुपयांपर्यंत होते.

याआधी अमेरिकन रॅपर कान्ये वेस्टचा कॉन्सर्टही हिंदुस्थानात दोन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आला होता. आयोजकांनी सांगितले की, ते शकीराच्या टीमसोबत मिळून नवीन तारखांवर काम करत आहेत आणि काही अंतिम होताच त्याची माहिती दिली जाईल.  ज्यांनी तिकिटे बुक केली आहेत ती त्यांना परत केली जातील.