
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने सोमवारी त्यांना उपचारासाठी रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या छातीत कफ झाला आहे. त्यांच्या प्राथमिक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून चिंता करण्यासारखे काही नाही, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. अभिजित लोढा यांनी दिली.
पवार हे बारामती येथील त्यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी होते. सोमवारी त्यांना घसा दुखणे, कफचा त्रास जणवत असल्याने श्वास घेण्यास काहीसा अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे तत्काळ त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

































































