
पुण्यात भारतरत्न घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलन करण्यात आले. ‘मी अशी शपथ घेतो की, मी स्त्रियांवर होणारा हिंसाचार कधीही खपवून घेणार नाही. माझे घर, माझा परिसर, माझे गाव, माझे कार्यालय अशा कोणत्याही ठिकाणी जर महिलांची छेडछाड किंवा अत्याचार होत असेल तर त्यास मी विरोध करून त्याबद्दल आवाज उठवीन. मी मुलगा आणि मुलगी असा भेदभाव कधीही करणार नाही. महिलांचा सन्मान राखीन आणि या पुण्यनगरीत, महाराष्ट्रात आणि देशात महिलांसाठी अधिकाधिक सुरक्षित व भयमुक्त स्थिती बनवण्यासाठी प्रयत्न करीन. जय हिंद!’, अशी शपथ शरद पवार यांनी सर्व उपस्थित आंदोलकांना दिली.
राज्यात राष्ट्रपती राजवट लावा!
बदलापूरची घटना ही लांच्छनास्पद आहे. संस्थाचालकांनी हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांची साथ मिळाली. मंत्रालयामधून दबाव होता की काय असं वाटत आहे. राज्यात महिला सुरक्षित नसून सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही तसेच कायदा- सुव्यवस्था ढासळलेल्या महाराष्ट्रात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी कॉँग्रेस विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी केली.
View this post on Instagram