
बुधवारी शेअर बाजारात चढ आणि उतार पाहायला मिळाल्यानंतर दिवसअखेर शेअर बाजार किरकोळ घसरणीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 40 अंकांनी घसरून 84,233 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 18 अंकांनी घसरून 25 हजार 953 अंकांवर बंद झाले. गेल्या तीन दिवसांपासून उसळणाऱया शेअर बाजाराला अखेर बुधवारी ब्रेक लागला.





























































