
एकीकडे हिंदुस्थानच्या शेअर बाजारात सोमवारी 247 अंकांची घसरण झाली, तर दुसरीकडे पाकिस्तानच्या शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. पाकिस्तानच्या शेअर बाजाराने नवा उच्चांक गाठत इंट्राडे ट्रेडिंगदरम्यान 1,35,000 चा टप्पा ओलांडला आणि आतापर्यंतचा उच्चांक गाठला. केएसई 100 निर्देशांक 1,423 अंकांनी वधारून 1,35,723 अंकांवर बंद झाला. गुंतवणूकदार फिक्स्ड इन्कम असेट क्लासमधून इक्विटीकडे वळत असल्याने शेअर बाजार नवीन उच्चांक गाठत आहेत.