Pune – भाजपच्या प्रवक्त्याच्या आईला कारने उडवले; ‘हा जाणीवपूर्वक केलेला हल्ला’ असल्याचा खळबळजनक आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
BJP's Shehzad Poonawalla Alleges Deliberate Attack on Mother in Pune; CM Orders Action

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला पुण्यामध्ये एका भरधाव कारने धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत त्यांच्या आई गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शहजाद पूनावाला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत हा अपघात नसून त्यांच्या आईला जाणीवपूर्वक कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

शहजाद पूनावाला यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘काही तासांपूर्वी एका अत्यंत विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीने माझ्या आईच्या अंगावर जाणीवपूर्वक कार घातली. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या असून आरोपी घटनास्थळावरून पसार झाला आहे. त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. माझ्या आईसारख्या प्रेमळ व्यक्तीसोबत या वयात असे घडणे पाहून माझा रक्त खवळत आहे. पुणे पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करावी आणि तो कायद्याच्या कचाट्यातून सुटू नये याची खात्री करावी.’

या घटनेनंतर शहजाद पूनावाला यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री कार्यालयाला (CMO) टॅग करत न्यायाची मागणी केली होती. याची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाने प्रतिसाद दिला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून त्यांनी शहजाद पूनावाला यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी राज्य पोलीस आणि पुणे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणात तातडीने आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी पूनावाला यांच्या आईच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी सदिच्छाही व्यक्त केली आहे.

पुणे पोलीस सध्या फरार आरोपीचा शोध घेत असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

BJP’s Shehzad Poonawalla Alleges Deliberate Attack on Mother in Pune; CM Orders Action

BJP spokesperson Shehzad Poonawalla’s mother was seriously injured after being hit by a car in Pune. Poonawalla alleged a deliberate attack. CM Devendra Fadnavis has directed Pune police to take strict action.