शिखर बँक घोटाळ्याची फाईल बंद, अजित पवारांसह इतरांना क्लीन चिट; न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट स्वीकारला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
court

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) कथित 25 हजार कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात कोणतीही फसवणूक किंवा अपहार करण्याचा अर्जदारांचा हेतू दिसून येत नसल्याचे नमूद करत मुंबईतील विशेष न्यायालयाने पोलिसांनी सादर केलेला क्लोजर रिपोर्ट स्वीकारला. त्यामुळे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्यासह इतरांना दिलासा मिळाला आहे. या क्लोजर रिपोर्टला आव्हान देणाऱ्या 20हून अधिक प्रोटेस्ट याचिका न्यायालयाने फेटाळल्या. समाजसेवक अण्णा हजारे यांनीही या अहवालाविरोधात याचिका दाखल केली होती.