
शहा सेनेचे मंत्री प्रताप सरनाईक चमकोगिरी करण्यासाठी विधान भवनातून निघून थेट मीरा रोडमध्ये पोहोचले. मात्र त्यांना पाहताच मोर्चेकऱ्यांच्या संतापाचा भडका उडाला. ‘आला रे आला गद्दार आला,’ ‘पन्नास खोके एकदम ओक्के’ अशा घोषणा घुमल्या. एका मोर्चेकऱ्याने त्यांच्या दिशेने पाण्याची बाटलीच भिरकावली. सरनाईक मखलाशी करण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु संतप्त आंदोलकांनी अवघ्या पाच मिनिटांत त्यांना पळवून लावले. पोलिसांनी कडे करून सरनाईकांना गर्दीतून बाहेर नेले.