
पुणे रेल्वे स्थानकावर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र, त्यांच्या सुरक्षेबाबत रेल्वे प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने बुधवारी रेल्वे विभागीय व्यवस्थापक कार्यालयाबाहेर आंदोलन केले. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 2023 मध्ये दिल्ली रेल्वे बोर्डाकडून आलेल्या 100 कोटी रुपयांच्या निधीचा काय उपयोग झाला? असा सवाल शिवसैनिकांनी विचारला.
रेल्वे स्थानकावर नव्याने 120 अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. दिनांक 23 मार्च 2023 रोजी तत्कालीन डीआरएम यांनीही हे स्पष्टपणे सांगितले होते. मात्र, अद्यापि एकही नवीन कॅमेरा बसविण्यात आलेला नाही. ‘पुणे स्टेशनची अवस्था ‘आओ-जाओ घर तुम्हारा’ झाली आहे, असा आरोप संतप्त शिवसैनिकांनी केला. स्टेशनवरील जुन्या झालेल्या 59 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी बहुतांश निकामी झाले असून, नवीन कॅमेरे बसवले गेले नाहीत. त्यामुळे 100 कोटींचा निधी कुठे गेला? प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या निधीचा अपहार झाल्याचा संशय जनतेमध्ये निर्माण झाल्याचे यावेळी शिवसेनेने स्पष्ट केले. रेल्वे व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा यांनी आंदोलकांशी चर्चा केली. यात त्यांनी 59 जुने सीसीटीव्ही कॅमेरे निकामी झाल्याचे मान्य करून 30 जूनपर्यंत 166 नवीन सीसीटीव्ही बसविले जातील, असे आश्वासन दिले.
आंदोलनात शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, राज्य संघटक वसंत मोरे, उत्तम भुजबळ, राजेश मोरे, अनिल परदेशी, किशोर रजपूत, रुपेश पवार, महिला आघाडी निवडणूक समन्वयक विद्या होडे, ज्योती चांदेरे, रोहिणी कोल्हाळ, सविता गोसावी, विजया बेंगळे, नसीम कांबळे, पार्वती कांबळे, संपदा कांबळे, योगेश इंगुळकर, पंकज बरिदे, सागर गंजकर, संजय व्हालेकर, अजय परदेशी, गिरीश गायकवाड, मनीष सिंग, संजय लोहोट, राहुल शेडगे, संतोष होडे, बंडूनाना बोडके, नागेश खडके, किशोर रजपूत, जुबेर शेख, नितीन निगडे, विजय पालवे, अभिषेक जगताप, दत्तात्रय घुले, प्रकाश पुजारी, विजय रावडे, मिलिंद पत्की, अजय परदेशी, प्रवीण रणदिवे, साहिल पिरजादे, जुबेर तांबोळी, संतोष गवळी, महेश मोरे, सागर लांडगे, संतोष बनसोडे, नितीन जगताप, नितीन शेलार, जयवंत गिरी, मेजर खोमणे, मंगेश रासकर, मोहन पांढरे, अशोक रसाळ आदी उपस्थित होते.