मुंबई महापालिकेचे कामकाज मराठीतून करा; शिवसेनेचे आयुक्त, महापौरांना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महापालिकेतच मायमराठीची गळचेपी होताना दिसत आहे. पालिकेचे कामकाज पूर्णपणे मराठीतून झाले पाहिजे  असा कायदा असतानाही अधिकारी सर्रास इंग्रजी भाषेचा वापर करताना दिसतात त्यामुळे पालिकेचे सर्व कामकाज मराठीतून व्हायलाच हवे अशी मागणी करत शिवसेनेने पालिका आयुक्त तसेच महापौरांना याबाबत निवेदन दिले आहे.

मुंबई महापालिकेतील अधिकाऱयांकडून बऱयाचदा इंग्रजीतून परिपत्रके काढली जातात, मुंबई महापालिकेत ज्या निवीदा निघतात त्या निवीदांचा मसुदा देखील इंग्रजी भाषेत असतो मुळात मुंबई महापालिकेचे कामकाज मराठीत झाले पाहिजे असा कायदा आहे परंतु आजही महापालिकेतील अधिकारी जास्तीत जास्त इंग्रजी भाषेचा वापर करताना दिसतात मराठी भाषेलाच हरताळ फासला जात असून यापुढे पालिकेचे कामकाज मराठीतून झालेच पाहिजे अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी केली आहे मराठी भाषा दिनाच्या दिवशीच नगरसेवक पडवळ यांनी पालिकेचे महापौर रितू तावडे आणि आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेत त्यांना याबाबतचे निवेदन सादर केले आहे.