तुर्कीच्या सेलीबी नास कंपनीतील कामगारांना लवकरच इंडो थाई कंपनीत सामावून घेणार

पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला मदत करणाऱया तुकाaच्या पंपन्यांवर बंदी घातली आहे. याचा परिणाम छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ग्राऊंड हॅण्डलिंगचे काम करणाऱ्या तुर्कीच्या ‘सेलेबी नास’ कंपनीचा सुरक्षा परवाना रद्द करण्यात आला. त्यामुळे या कंपनीतील 3700 कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. मात्र भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नामुळे या कामगारांचे भविष्य आता सुरक्षित झाले असून त्यांना ‘सेलेबी नास’च्या जागी येणाऱया इंडो थाई कंपनीत सध्या मिळत असलेल्या वेतनावर सामावून घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कर्मचाऱयांना भारतीय कामगार सेनेचे आभार मानले आहेत.

तुर्कीच्या ‘सेलेबी नास’ या पंपनीत सुमारे 3700 कामगार कार्यरत होते, जे सर्व भारतीय कामगार सेनेचे सभासद आहेत. गेली 16 वर्षे भारतीय कामगार सेना हीच मान्यताप्राप्त संघटना आहे. सरकारने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे या कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना नेते – खासदार आणि भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त सरचिटणीस संजय कदम यानी गंभीर दखल घेत यासंदर्भात पावले उचलली. इंडो थाई कंपनी सेलीबी नास कंपनीचा कारभार हाती घेणार असल्याचे कळताच त्यांच्याशी तातडीने संपर्क साधला आणि बुधवारी इंडो थाई पंपनीच्या व्यवस्थापनसोबत बैठक घेतली. सेलीबी नास पंपनीतील सर्व कामगारांना जसे आहे तसे या तत्त्वानुसार इंडो थाई कंपनीत सध्या मिळत असलेल्या वेतनावर सामावून घेण्याचे मान्य करण्यास भारतीय कामगार सेनेने भाग पाडले. त्यामुळे 3700 कामगारांना न्याय मिळाला आहे.

या बैठकीत इंडो थाई कंपनीचे सीएमडी मलानी आणि अन्य अधिकारी, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, संयुक्त सरचिटणीस संजय कदम आणि युनिटचे अध्यक्ष कारेकर, राजा ठाणगे, संतोष कदम, पाटील, दिलीप भट उपस्थित होते.