शिवसेनेचा पदाधिकारी-कार्यकर्ता सुसंवाद मेळावा, आज ठाण्यात शुभारंभ

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात शिवसेनेचे ठिकठिकाणी पदाधिकारी-कार्यकर्ता सुसंवाद मेळावे होणार आहेत. या मेळाव्याचा शुभारंभ रविवारी (02 मार्च 2025) ठाण्यातून होणार आहे. या वेळी महाराष्ट्रातील शिवसेना नेते मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

संघटनेची भक्कम बांधणी करण्यासाठी उद्धव ठाकरे दर मंगळवारी शिवसेना भवनात आढावा बैठक घेणार आहेत. त्याचबरोबर पक्षाचे नेते राज्यभर दौरे करणार आहेत. याच संकल्पनेचा भाग म्हणून शिवसेनेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा सुसंवाद मेळावा महाराष्ट्रात ठिकठिकाणी होणार आहे. या मेळाव्याचा शुभारंभ 2 मार्च रोजी ठाण्यातून होणार आहे. खारकर आळीतील एनकेटी सभागृहात सायंकाळी 4 वाजता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्याला शिवसेना नेते दिवाकर रावते, सुभाष देसाई, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई, भास्कर जाधव, चंद्रकांत खैरे, अनिल परब, राजन विचारे, सुनील प्रभू, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मार्गदर्शन करणार आहेत.

स्थळ एनकेटी सभागृह

वेळ सायं. 4 वाजता