
आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविक पंढरपूरला तसेच प्रति पंढरपूर असलेल्या मुंबईतील वडाळा येथील विठ्ठल मंदिरात दाखल झाले. आषाढी एकादशीनिमित्त शिवसेनेकडून मुंबईत मोफत तुळशीचे वाटप, वारकऱ्यांसाठी मोफत प्रथमोपचार पेंद्र व आरोग्य चिकित्सा शिबीर तसेच राजगिरा लाडूंचे मोफत वाटप यासारखे उपक्रम राबवण्यात आले.
शाखा क्रमांक 192 च्या माजी नगरसेविका प्रीती पाटणकर यांच्या वतीने दादरमधील श्री विठ्ठल मंदिरात तुळस, लाडूंचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते खासदार अनिल देसाई, उपनेत्या विशाखा राऊत, आमदार-विभागप्रमुख महेश सावंत, श्रद्धा जाधव, प्रकाश पाटणकर, यशवंत विचले, सूर्यकांत बिर्जे, प्रवीण नरे, रीमा पारकर, कल्पना पालयेकर उपस्थित होते.
रेल कामगार सेनेचे अध्यक्ष विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली रेल कामगार सेनेचे सरचिटणीस दिवाकर देव आणि कार्याध्यक्ष संजय जोशी यांच्या सहकार्याने सीएसएमटी येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आयोजित केला होता. यावेळी खंडू दाते, राजेश पालकर, राम राणे, विक्रम चव्हाण, अजय साटम यांच्याबरोबर सेंट्रल लाइन भजनी मंडळे उपस्थित होती.
विलेपार्ले पूर्व येथे शाखा क्रमांक 84 च्या वतीने शिवसेना नेते अॅड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशीनिमित्त भाविकांसाठी तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी संदीप नाईक, रूपाली शिंदे, शुभदा पाटकर, चंद्रकांत पवार, प्रकाश सपकाळ, अपर्णा उतेकर, आनंद पाठक, अमित जोशी, नितेश गुरव आदी उपस्थित होते. विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
शाखा क्रमांक 219 वतीने मोफत तुळशी रोपाचे वाटप अॅड. वर्षा सुखटणकर, शाखा संघटक योगिता पेंढारकर, सहसमन्वयक प्रकाश मिसाळ, ग्राहक संरक्षण कक्षाचे बाळा पह्फे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन शाखाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केले होते.
मलबार हिलचा राजाच्या वतीने शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर यांच्या हस्ते आषाढी एकादशीनिमित्त एक हजार तुळशी रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष बाबू पटेल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.