शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना सचिवपदी संजय लाखेपाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासह शिवसेनेचे चार संघटक जाहीर करण्यात आले आहेत.
ललिता पाटील, वसंत मोरे, मुकेश साळुंके यांची शिवसेना संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळवण्यात आली आहे.
वरुण सरदेसाई वांद्रे पूर्व विधानसभाप्रमुख
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई उपनगर जिह्यातील वांद्रे पूर्व विधानसभा प्रमुखपदी वरुण सरदेसाई यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे, असे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून कळवण्यात आले आहे.