शाखा क्र. 21 आणि शाखा क्र. 35 मधील पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना शाखा क्रमांक 21 च्या शाखाप्रमुखपदी शिदू (बबन) गंगाराम गावडे यांची तर शाखा संघटकपदी सिद्धी संसारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच शाखा क्र. 35 च्या शाखा संघटकपदी सावित्री शिंदे यांची नियुक्ती केल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.