
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून व विभागप्रमुख सोमनाथ सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मेश्राम’ फाऊंडेशनच्या सहकार्याने चांदिवली विधानसभा क्षेत्र शाखा क्र. 158 मध्ये पाच दिवसीय नागरी सुविदा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात ज्येष्ठ नागरिक कार्ड, आयुष्मान कार्ड, आधार कार्ड दुरुस्ती, आभा कार्ड, ई-श्रम कार्ड, आयुष्मान वंदना कार्ड व नवीन मतदार नोंदणी अशा विविध सेवांचा विनामूल्य लाभ नागरिकांना घेता येणार आहे. या लोकोपयोगी उपक्रमाचा शुभारंभ विभाग क्रमांक 6 चे विभागप्रमुख सोमनाथ सांगळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ‘मेश्राम’ फाऊंडेशनचे सचिन अहिरेकर, शिवसेना महिला विभाग संघटक मनीषा नलावडे, माजी नगरसेविका चित्रा सांगळे यांच्यासह शिवसेना चांदिवली विधानसभेचे सर्व पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.