
शिवसेनेची कार्यालये ही न्यायालये बनली पाहिजेत, तिथे जनतेला न्याय मिळाला पाहिजे अशी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण होती. त्याच तत्त्वावर चालणाऱ्या शिवसेनेच्या जनता दरबारात आतापर्यंत हजारो लोकांना न्याय मिळाला आहे. हा जनता दरबार आता जगभरात पोहोचणार आहे. लवकरच त्यावर आधारित माहितीवर ओटीटीवर झळकणार आहे.
शिवसेना उपनेते नितीन नांदगावकर हे शिवसेना भवनामध्ये जनता दरबार भरवतात. पोलीस आणि प्रशासन जिथे हतबल होते तिथे शिवसेनेचा जनता दरबार कामी येतो. अडलेल्या- नडलेल्यांच्या समस्या तत्काळ सोडवल्या जातात. या जनता दरबारावर त्याच नावाने 45 मिनिटांचा माहितीपट बनवला गेला आहे. त्याचे संकलन आणि दिग्दर्शन शैलेश आचरेकर यांनी केले आहे. शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांच्या हर्षल मीडिया अॅण्ड एंटरटेन्मेंट एल. एल. पी. निर्मित या माहितीपटाला आजपर्यंत 18 आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळाली आहेत.