
मुंबई महापालिकेत भाजप आणि मिंधे गटाची गटनोंदणी झालेली नाही. याबाबत प्रतिक्रिया देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, दोघांमध्येही आता काहीही जुळत नाही. त्यामुळे ही गटनोंदणी घस्थापनेपर्यंत पुढे जाण्याची शक्यता आहे, असा टोला त्यांनी भाजप आणि मिंधे गटाला लगावला.
भाजप आणि मिंधे गटाची गटनोंदणी अद्याप झाली नसल्याचे त्यांना सांगितल्यावर ते म्हणाले की, ही गटस्थापना घटस्थापनेपर्यंत पुढे जाण्याची शक्यता आहे. त्या दोघांमध्ये काहीही जुळत नसल्याचे दिसत आहे. मिंधे रुसून बसले आहेत, रुसून बसलेल्या सूनबाई सारख्या दिल्लीत फेऱ्या मारत आहेत. दिल्लीचे सासरेही त्यांचे ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांची अडचण झाली आहे. आपल्याच पक्षाचा महापौर होणार, असे ते बोलून गेले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या इज्जत का सवाल आहे, अशी त्यांची स्थिती झाली आहे.
माझे ते माझे आणि तुझे ते माझ्या बापाचे अशी भाजपची भूमिका असते. त्यामुळेच आम्ही त्यांच्या पासून दूर झालो, असे त्यांनी सांगितले.





























































