
मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये आज गारगाई धरण प्रकल्पावरून जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. या धरणाच्या नावाखाली केवळ कंत्राटदारांचे भले करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सदस्यांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला. या प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत मिंधे सरकारवर सडकून टीका केली आहे.
X वर पोस्ट करत आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, “आज बीएमसी स्टँडिंग कमिटीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सर्व सदस्यांनी गारगाई धरणाच्या नावाखाली होणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर पूजेला विरोध केला. पाणी मुंबईला हवं आहेच, पण कमी खर्चात, कमी वेळात आणि पर्यावरणाचा ऱ्हास न करता आपण डिसॅलिनेशन करून अधिक पाणी प्राप्त करू शकतो. महाविकास आघाडीच्या काळात मनोरी येथील शासनाची २५ एकर जमीन मोफत महापालिकेला देऊन आपण २०२५ पर्यंत ४०० MLD पाणी शहरासाठी उपलब्ध करत होतो. तो प्रोजेक्ट मिंधे सरकारने रद्द केला.”
आदित्य ठाकरे म्हणाले, “आता गारगाई धरणामागे लागले आहेत, कारण कॉन्ट्रॅक्टरचा विकास करायचा आहे. गारगाई धरणावर हजारो कोटींचा खर्च, ५ लाख झाडांची कत्तल होणार आहे. तेही तानसा वन्यजीव अभयारण्यात आणि फक्त ४४० MLD पाणी मिळणार आहे. बरं एवढं सगळं करून धरण बांधलं तरी आपण पावसावर अवलंबून राहणारच. डिसॅलिनेशन प्रोजेक्ट हा कमी खर्चाचा, ६०० MLD पर्यंत पाणी उपलब्ध करून देणारा, सोलर एनर्जीवर चालणारा आणि पावसावर अवलंबून नसणारा आहे. मग हे कॉन्ट्रॅक्टर प्रेम कशासाठी? बीएमसीने गारगाईवर खर्च न करता, मुंबईला डिसॅलिनेशन प्रोजेक्ट द्यावा.”
🚨 आज BMC स्टँडिंग कमिटीमध्ये @ShivSenaUBT_ पक्षाच्या सर्व सदस्यांनी गारगाई धरणाच्या नावाखाली होणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर पूजेला विरोध केला.
⚠️ पाणी मुंबईला हवं आहेच, पण कमी खर्चात, कमी वेळात आणि पर्यावरणाचा ऱ्हास न करता आपण डिसॅलिनेशन करून अधिक पाणी प्राप्त करू शकतो.
महाविकास…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 11, 2026

























































