शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याचा आज तिसरा दिवस आहे. बुधवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, खासदार राघव चड्ढा, खासदार संजय सिंह उपस्थित होते.
दरम्यान, या भेटीचे फोटो शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आपल्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून शेअर केले आहेत. आज सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.
“देशाची सामाजिक वीण उद्ध्वस्त करणाऱ्या सर्व दुष्ट शक्तींविरोधात आपण एकजुटीने लढतो, हा खरा हिंदुस्थान आहे. भारतीय जनता पक्ष अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य करत आहेत. कारण भाजपला त्यांची भीती वाटतेय. संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आमचा लढा सुरुच आहे”, असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.
This morning, Shri. Uddhav Balasaheb Thackeray ji called on Smt. Sunita Kejriwal ji.
We are all united in fighting against forces that want to destroy to fabric of Bharat, that is India. The central agencies are targeting @ArvindKejriwal ji because the bjp fears him.Our fight… pic.twitter.com/GuZ3Dz850w
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 8, 2024