
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबईतील विधानसभा मतदारसंघाकरिता महिला विधानसभा प्रमुख, विधानसभा संघटक व विधानसभा संचालिका यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
पदाधिकारी पुढीलप्रमाणे
विधानसभाप्रमुख – तेजस्वी घोसाळकर (दहिसर विधानसभा), शरयू भोसले (बोरिवली विधानसभा), रेखा बोराडे (मागाठाणे विधानसभा), सुषमा कदम (चारकोप विधानसभा), शुभांगी शिंदे (कांदिवली पूर्व विधानसभा), गीता भंडारी (मालाड पश्चिम विधानसभा), विधानसभा संघटक – मेघना काकडे (वर्सोवा विधानसभा), सरोज भिसुरे (अंधेरी पश्चिम विधानसभा), विधानसभा प्रमुख – बेबी फर्नांडिस (वर्सोवा विधानसभा), सुनिला इलावडेकर (अंधेरी पूर्व विधानसभा), विना टॉक (अंधेरी पश्चिम विधानसभा), श्रद्धा नाटेकर (घाटकोपर पूर्व विधानसभा), मेघा सावंत (घाटकोपर पश्चिम विधानसभा), सुनंदा लोकरे (मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा), विधानसभा संचालिका – निशा जंगम (घाटकोपर पश्चिम विधानसभा), विधानसभाप्रमुख – अनुपमा परब (वरळी विधानसभा), गौरी चौधरी (शिवडी विधानसभा), सुरेखा राऊत (भायखळा विधानसभा), अरुंधती दुधवडकर (मलबार हिल विधानसभा), गायत्री आवळेगावकर (मुंबादेवी विधानसभा), पल्लवी सकपाळ (कुलाबा विधानसभा).
विभाग क्र. 7 च्या महिला विभागसंघटकपदी रश्मी पहुडकर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 7 करिता महिला विभागसंघटकपदी रश्मी पहुडकर (विधानसभा – मुलुंड, विक्रोळी, भांडुप पश्चिम) यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे अशी माहितीही शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे.