शिवाजी पार्क जिमखान्याने मारली बाजी, ओपन इंटरक्लब टेनिस चॅम्पियन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई ओपन इंटरक्लब टेनिस चॅम्पियनशिप 2026 ही स्पर्धा शिवाजी पार्क जिमखाना टेनिस कोर्ट येथे पार पडली. या स्पर्धेत बॉम्बे जिमखाना, सीसीआय, खार जिमखाना, शिवाजी पार्क जिमखाना, एमसीए, वुडहाऊस अशा सुमारे 20 नामांकित क्लबने सहभाग घेतला. अंतिम फेरीत शिवाजी पार्क जिमखान्याने बाजी मारली.

मुंबई ओपन इंटरक्लब टेनिस चॅम्पियनशिप ही स्पर्धा शिवाजी पार्क जिमखाना यांच्या वतीने, महाराष्ट्र जिल्हा टेनिस संघटना आणि महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा गोल्ड लिफ आणि स्पोर्ट्स सुत्रा या मॅनेजमेंट पार्टनर्सच्या व्यवस्थापनाखाली शनिवारी पार पडली. पहिला उपांत्य सामना शिवाजी पार्क जिमखाना आणि खार जिमखाना यांच्यात खेळवण्यात आला, ज्यामध्ये शिवाजी पार्क जिमखान्याने अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसरा उपांत्य सामना मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आणि सीसीआय यांच्यात पार पडला, ज्यामध्ये एमसीएने अंतिम फेरी गाठली. अंतिम सामना शिवाजी पार्क जिमखाना आणि एमसीए यांच्यात झाला. या सामन्यात शिवाजी पार्क जिमखाना विजेता ठरला. या स्पर्धेचे आयोजन शिवाजी पार्क जिमखानाचे टेनिस सचिव योगेश परुळेकर आणि जनरल सेव्रेटरी संजिव खानोलकर यांनी केले होते. अंतिम सामन्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला.