
गृहमंत्रालयाचे काम अतिशय अपयशी ठरले आहे. पुलवामामध्ये 40 जवान शहीद झाले. त्यानंतर पहलगाममध्ये 26 माताभगिनींचे कुंकू पुसले गेले. त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत, त्यांनी राजीनामा देण्याची गरज आहे. अमित शहा हे देशावर लादलेले गृहमंत्री आहे, असे सांगत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
ऑपरेशन सिंदूर हे जवानांमुळे यशस्वी झाले. मात्र, यातही भाजपचे अपयश आहे. ट्रम्प यांच्या धमकीमुळे त्यांनी माघार घेतली. देशहिताचा विचार करून आम्ही यावर जास्त वक्तव्ये करत नाही. ऑपरेशन सिंदूर करण्याची गरज का भासली याचा विचार करणे गरजेचे आहे. पहलगामममध्ये 26 महिलांचे कुंकू पुसण्यात आले. त्याला देशाचे गृहमंत्री अमिश शहा जबाबदार आहेत.याचे पायश्चित्त घेण्यासाठी शहा यांनी राजीनामा देण्याची गरज आहे. कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरल्याने पंतप्रधानांनी त्यांचा राजीनामा घेत त्यांना मंत्रिमंडळातून बरखास्त केले पाहिजे. कोणतीही जबाबदारी न स्वीकारणारे अमिश शहा महाराष्ट्रात येत ज्ञान पाजळत आहेत, असेही ते म्हणाले.
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते तर ते काय म्हणाले असेत हे त्यांनी सांगायची गरज नाही. तडीपार आणि मर्डर केसमध्ये अडकलेल्यांना अशा व्यक्तींना आपण का वाचवले याचा त्यांना पश्चात्ताप झाला असात, असे संजय राऊत म्हणाले. अमिश शहा यांनी महाराष्ट्राच्या वाटेला जाऊ नये, थोडीजर नैतिकता शिल्लक असेल तर राजीनामा द्या, असेही त्यांनी ठणकावले. त्यांच्या बेईमानीला उद्धव ठाकरे शरण गेले नाही, हा त्यांचा राग आहे. हिंदुहृदयसम्राटांची शिवसेना त्यांनी स्वार्थासाठी फोडली, यासाठी बाळासाहेबांनी त्यांना मिठी मारली असती काय? हा बाळासाहेबांचा अपमान आहे. महाराष्ट्र असा अपमान सहन करणार नाही.
ऑपरेशन सिंदूरचे श्रेय घेत आहेत. मात्र. 26 जणींचे कुंकू पुसण्यात आले, याला तेच जबाबदार आहेत. दहशतवादी हल्ला करणारे दहशतवादी कोठे आहेत. ते गुजरातमध्ये पळाले की, त्यांना भाजपने दाहोदमध्ये लपवले, असा सवाल त्यांनी केला. ज्या दाहोदमध्ये औरंगजेबाचा जन्म झाला, तेथे मोदींनी अनेक गर्जना केल्या, मात्र, या घटनेला त्यांचे सरकार जबाबदार आहे. नैतिक जबाबदारी स्वीकारत शहा राजीनामा देण्याऐवजी देशातील सर्वात भ्रष्ट व्यक्ती असा उल्लेख केलेल्या अशोक चव्हाण यांच्या घरी शहा आमरस पुरी आणि ढोकळ्यावर ताव मारत होते. हे त्यांचे असंवेदनशीलतेचे लक्षण आहे. त्यामुळे त्यांनी जास्त ज्ञान पाजळू नये, असे संजय राऊत म्हणाले.
पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरबाबत चर्चा करण्याची भाजपची हिंमत नाही. आम्ही याबाबत विशेष सत्राची मागणी केली आहे. ते टाळण्यासाठी त्यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ परदेशात पाठवले. मात्र, विरोधी पक्षांनी विशेश सत्राची मागणी केली आहे. याबाबत देशातील जनतेला माहिती मिळण्याची गरज आहे. मात्र, मोदी, शहा हे प्रश्नांना सामोरे जाण्यास घाबरत आहेत. ते फक्त भाषणे देतात आणि निघून जातात, असेही ते म्हणाले.