भयंकर! नोकरीच्या बहाण्याने क्लिनिकमध्ये बोलावले, अन् तरुणाचे आयुष्य केले उद्ध्वस्त

नोकरी देण्याच्या बहाण्याने एका 19 वर्षीय तरुणासोबत संतापजनक प्रकार केल्याचा  समोर आला आहे. त्याला नोकरीसाठी एका व्यक्तीने क्लीनिकमध्ये बोलावले आणि त्याची फसवणूक करुन त्याचे आयुष्य उद्ध्व्स्त केले. हा धक्कादायक प्रकार चीनमधील वुहान प्रांतात घडला आहे.

एका ब्युटी क्लिनीकमध्ये 19 वर्षीय तरुणाला 35 हजार रुपये पगाराचे आमिष दाखवून त्याला ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी करायला भाग पाडले. ओडिटी सेंट्रलच्या वृत्तानुसार, त्या तरुणाला विश्वास दाखविण्यात आला की, हा एक ट्रेण्ड असून याने तो एक यशस्वी लाईव्ह स्ट्रीमर बनवू शकतो आणि भरपूर सारे पैसे कमावू शकतो आणि बरा झाल्यानंतर तो नोकरीत रूजू होऊ शकतो.

वृत्तानुसार, तरुण मानसिकरित्या कमजोर होता आणि ब्युटी क्लिनीकने त्याचाच फायदा घेतला आणि त्याला ब्रेस्ट इम्लांट सर्जरी करायला भाग पाडले. एवढेच नाही तर त्या तरुणाने ही सर्जरी करण्यासाठी 3 लाख रुपयांचे लोन घेतले. याशिवाय 80 हजाराहून अधिक रुपये खर्च केले, त्याने त्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाली. चीनमधील ही घटना म्हणजे समाजातील वाढती अनैतिकता आणि लोकांच्या मानसिक आरोग्याबाबत बेफिकीरपणाचे उदाहरण आहे.