विधानसभा अध्यक्षांकडून कृषीमंत्र्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न? सभागृहात व्हिडीओ शूट करणे म्हणजे विधिमंडळाचा अपमान, राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणी आपण चौकशीचे आदेश दिले आहेत अशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे. तसेच विधीमंडळात अशा प्रकारे व्हिडीओ काढणे चुकीचे आहे असेही नार्वेकर म्हणाले.

राहुल नार्वेकर म्हणाले की, माणिकराव कोकाटे प्रकरणी आपण चौकशीचे आदेश दिले आहे. यावर अहवाल सादर झाल्यानंतरच आपण यावर प्रतिक्रिया देऊ. पण असे असेल तरी विधानसभेत अशा प्रकारे व्हिडीओ शूट करणे प्रतिबंधात्मक आहे. हा विधिमंडळाचा अपमान आहे, याचीही चौकशी होणार असेही नार्वेकर म्हणाले.