
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार श्रद्धा जाधव या वाॅर्ड क्रमांक २०२ मधून विजयी झाल्या आहेत. या आधी श्रद्धा जाधव यांनी मुंबईच्या महापौर पदाची धुरा सांभाळली होती. स्थानिक राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांची सलग सहा वेळा 1992 ते 2017 मुंबई महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून निवड झाली होती.
या निवडणुकीमध्ये श्रद्धा जाधव यांना ११ हजार १४३ मते मिळाली असून, त्यांनी भाजपच्या पार्थ बावकर यांचा दारुण पराभव केला आहे.
या विजयावर प्रतिक्रिया देताना श्रद्धा जाधव म्हणाल्या, मला हा निकाल अपेक्षित होता. माझ्या मतदारसंघातील नागरिकांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे मला हा विजय मिळवता आला आहे. मतदारांनी ठाकरेंवर विश्वास दाखवला असून हा विजय हा विकासाचा आहे. मला मिळालेला विजय हा विकासाचा असून, मतदारांनी शिवसेनेचा पारंपारिक गड राखला.





























































