गुजरातेत नववी ते बारावी भगवद्गीतेचे धडे, सरकारचा निर्णय हिंदी, इंग्रजी आणि उर्दू शाळांनाही बंधनकारक

गुजरात राज्यात इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना श्रीमद् भगवद्गीता शिकवली जाणार आहे. हा नियम गुजराती, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांना बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व माध्यमांना भगवद्गीतेचे शिक्षण देण्यासाठी गुजरात सरकारने हे पाऊल राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत उचलण्यात आले आहे, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना गीतेच्या नैतिक आणि अध्यात्मिक शिक्षणाशी जोडणे हा यामागचा उद्देश आहे, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. माध्यमिक शिक्षण बोर्डाने या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या भाषेतील पाठय़पुस्तकात गीतेच्या मूल्यावर आधारित अध्यायचा समावेश आहे. गीतेच्या अध्यायाचा थेट पाठय़पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. यासाठी हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांसाठी वेगवेगळी पुस्तके तयार करण्यात आली आहेत.दरम्यान, गुजरात सरकारच्या या निर्णयाचा जमीयत उलेमा ए हिंद या संघटनेने विरोध दर्शवला आहे.