एका दिवसात चांदी 9 हजारांनी महागली

या वर्षात सोन्या-चांदीच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे. मात्र, दिवाळीनंतर सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती. त्यानंतर सोने आणि चांदीचे दर स्थिर राहण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली होती. मात्र, शुक्रवारी एका दिवसात चांदीच्या दरात तब्बल 9 हजार रुपयांची वाढ झाली. तर सोनेच्या दरानेही मोठी झेप घेतली आहे. सोने-चांदीच्या किमती झपाट्याने वाढल्या असताना, काही दिवसांपासून त्यात लक्षणीय घट दिसून आली आहे. गेल्या आठवडय़ात सोन्या-चांदीच्या किमतीत मोठे बदल झाले.