एका झटक्यात सोन्या-चांदीत मोठी घसरण; सोने 5000 तर चांदी 28 हजारांनी झाली स्वस्त

या वर्षात सोने-चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. गुरुवारी चांदीने विक्रम करत चांदीच्या किमती 4 लाखांच्या वर गेल्या होत्या. तर सोने 1 लाख 92 हजारापर्यंत आले होते. मात्र, गुरुवारी संध्याकाळपासून दोन्ही धातूंच्या किमतीत थोडी घसरण झाली होती. मात्र, शुक्रवारी वायदे बाजार सुरू होताच झका झटक्यात दोन्ही धातूंमध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. दुपारी 12.30 वाजेपर्यंत सोने 5 हजार तर चांदी 28 हजारांनी स्वस्त झाले होते. आता चांदी त्याच्या 4 लाखांच्या उच्चांकाच्या खाली आली आहे. ही घसरण नफावसुलीमुळे झाल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

बऱ्याच काळानंतर, सोने आणि चांदीच्या किमती अखेर घसरल्या आहेत. शुक्रवारी, एमसीएक्सवरील चांदीच्या वायदा किमती एका झटक्यात जवळजवळ 28,000 प्रति किलोने घसरल्या आणि 4 लाख रुपयांच्या खाली आल्या.

सोने आणि चांदीच्या किमती सातत्याने वाढत होत्या. मात्र, शुक्रवारी वायदे बाजार सुरू होताच त्या घसरल्या. सर्वात मोठी घसरण चांदीच्या किमतीत झाली आहे. एमसीएक्सवरील त्याच्या फ्युचर्स किमतीत जवळपास 28000 ने घसरण झाली आहे. केवळ चांदीच नाही तर सोन्याच्या किमतीही घसरल्या आहेत. त्या प्रति 10 ग्रॅम 5000 ने घसरल्या आहेत. गुरुवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील चांदीचा भाव इतिहासात पहिल्यांदाच प्रति किलोग्रॅम ४००,००० च्या पुढे जाऊन विक्रमी उच्चांक गाठला. तथापि, तो प्रति किलोग्रॅम ३९९,८९३ वर बंद झाला. शुक्रवारी एमसीएक्सवर व्यवहार पुन्हा सुरू झाला तेव्हा, ५ मार्च रोजी संपणाऱ्या चांदीच्या फ्युचर्स किमती ₹२३,९९३ ने घसरून ₹३७५,९०० वर आल्या. चांदीचा उच्चांक प्रति किलोग्रॅम ₹४२०,०४८ होता आणि त्यानंतर तो एका दिवसात ४४,१४८ ने घसरला आहे.

सोन्याच्या किमतीतही चांदीप्रमाणे घसरण झाली. गुरुवारी, चांदीप्रमाणेच, सोनेही झपाट्याने वाढला आणि नवीन उच्चांक गाठल्यानंतर अखेर १,८३,९६२ वर बंद झाले. मात्र, शुक्रवारी बाजार सुरू होताच ते एकाच झटक्यात ८,८६२ ने घसरले आणि १,७५,१०० प्रति १० ग्रॅम झाले. गुरुवारी सोन्याचा दर १,९३,०९६ या नवीन उच्चांकावर पोहोचला होता आणि या पातळीपासून शुक्रवारी ते १७,९९६ ने स्वस्त झाले आहे.

या घसरणीबाबत तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मौल्यवान धातूंनी वेगाने नवीन उच्चांक गाठल्यानंतर बाजारात जोरदार विक्री झाली. गुंतवणूकदारांनी केलेल्या या नफा-वसुलीमुळे किमतींमध्ये अचानक मोठी घसरण झाली आहे. तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी अणु करारासाठी वाटाघाटी करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्याचे परिणाम सोन्या चांदीच्या दरावर दिसून आले आहेत.