आठवडाभरात चांदी अडीच हजारांनी महागली

सोने आणि चांदीला अच्छे दिन आले असून अवघ्या आठवडाभरात चांदी थेट अडीच हजार रुपयांनी महागली आहे. तर सोन्याच्या किंमतीत सुद्धा वाढ झाली आहे. गेल्या आठवडयात म्हणजेच 11 जुलैला चांदी 1 लाख 10 हजार 290 रुपये प्रति किलो होती. ती 18 जुलैला 1 लाख 12 हजार 700 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. सोने मागील आठवडयात 97,511 रुपये प्रति तोळा होते. ते आता 98,243 रुपये प्रति तोळा झाले आहे. चांदीच्या किंमतीत 2 हजार 410 रुपयांची वाढ झाली तर सोने 732 रुपयांनी महागले आहेत.