स्वयंपाकाचा गॅस लवकर संपतोय – हे करून पहा

स्वयंपाक करण्याच्या पद्धतीत छोटे-छोटे बदल करून तुम्ही गॅस वाचवू शकता. योग्य पद्धतीने बर्नरचा वापर करा मोठ्या बर्नरवर छोटी भांडी ठेवल्यामुळे गॅस वाया जातो. याउलट छोटय़ा बर्नरवर मोठे भांडे ठेवल्याने अन्न शिजायला जास्त वेळ लागतो आणि गॅस जास्त जातो.

प्रेशर कुकरचा वापर करणे गॅस वाचवण्याचा एक उत्तम उपाय आहे. डाळी किंवा कडधान्य शिजवण्यापूर्वी किमान एक तास कोमट पाण्यात भिजत घातल्यास निम्म्या वेळेत शिजतात. दूध, भाज्या किंवा पीठ फ्रिजमधून काढल्या काढल्या लगेच गॅसवर ठेवू नका. ते आधी सामान्य तापमानाला येऊ द्या.