पांढरे कपडे स्वच्छ धुण्यासाठी, हे करून पहा

पांढरे कपडे स्वच्छ धुणे जरा कठीण काम असते. त्यावर कोणताही डाग पटकन दिसतो. त्यामुळे पांढरे कपडे धुण्यापूर्वी बेकिंग सोडा आणि पाणी यांची पेस्ट बनवून डागावर लावा व काही वेळ राहू द्या. नंतर ब्रशने हलके घासून स्वच्छ धुवा. कपडे धुण्यापूर्वी ते लिंबाचा रस आणि पाण्याच्या मिश्रणात भिजवा. लिंबाचा रस नैसर्गिक ब्लीच म्हणून काम करतो.

कपडे धुण्यासाठी कोमट पाणी चांगले काम करते, पण जर कपडय़ांवर ‘गरम पाणी वापरू नका’ असे लेबल असेल, तर थंड पाणी वापरा. जास्त डिटर्जंट वापरणे टाळा. धुण्याच्या प्रक्रियेनंतर भरपूर स्वच्छ पाण्याने कपडे स्वच्छ धुवा. शक्य असल्यास कपडे उन्हात वाळवा.