
पर्वतीय राज्यांमध्ये पुन्हा एकदा बर्फवृष्टी सुरू झाली आहे. जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टीमुळे तापमानात घट झाली आहे. येथे बर्फवृष्टीसह पावसाचाही इशारा देण्यात आला आहे. हिमाचलमध्ये 24 तासांत तापमान 8 अंशाने कमी झाले. मनालीचे तापमान 12.6 अंश होते, यात 7 अंशाची घट झाली. तर, सोलनमध्ये शुक्रवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग, चमोली आणि पिथौरागढमध्ये बर्फवृष्टी झाली आहे. तर देहरादूनमध्ये कमाल तापमान 34.1ष्टण् होते, येथे उष्णतेमुळे लोक त्रस्त आहेत. राजस्थानमधील जैसलमेर, बाडमेर आणि बालोतरा येथे कमाल तापमान 39-41 अंश दरम्यान होते.



























































