
शिवसेना शाखा क्र. 97 सांताक्रुझ पश्चिम शाखेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आधारकार्ड शिबीर, केनिया आय हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत नेत्रचिकित्सा शिबीर व चष्मा वाटप तसेच दिव्यांगांसाठी आधारकाठी, ज्येष्ठांना शेक पिशवीचे वाटप शिवसेना नेते विभागप्रमुख आमदार अॅड. अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उषा भोजने, अन्वेषा परब, वैशाली राऊत, सुनील मोरे उपस्थित होते.
शिवसेना शाखा क्रमांक 24 च्या माध्यमातून विभागातील रहिवाशांसाठी मोफत नेत्र तपासणी आणि गरजूंना मोफत चष्मा वाटप कार्यक्रम विभागप्रमुख अजित भंडारी व विभाग संघटक मनाली चौकीदार यांच्या सूचनेनुसार आयोजित केला होता.यावेळी अॅड. कमलेश यादव, कृष्णा मुळीक, नंदू मोरे, रवींद्र वेदपाठक, धर्मदास सावंत, अनिता बागवे, प्रकाश शिंदे, शुभांगी शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपशाखाप्रमुख, शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेना शाखा क्र. 5 च्या वतीने माजी नगरसेवक संजय घाडी यांच्या संकल्पनेतून ज्युनिअर के.जी. ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. यावेळी शिवसेना उपनेत्या-प्रवक्त्या संजना घाडी, सुयश घाडी, परीक्षक साहिल मालाडकर, गुरुनाथ मेस्त्राr, संदीप शेलार,पूजा गावडे, तन्वी मासये, नीलेश राणे, मनोहर जाधव, प्रतिभा अफंडकर, विनय बांदेकर, घाग, हेमा जाधव, समीर बोरकर, प्रकाश झोरे, अशोक पेंढुलकर, अनंत साठल्ये उपस्थित होते.
शिवसेना शाखा क्रमांक 194 चे शाखा समन्वयक चंदन साळुंखे यांच्या वतीने भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा-पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हा कार्यक्रम शिवसेना नेते दिवाकर रावते, विभागप्रमुख आमदार महेश सावंत, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, शाखाप्रमुख शैलेश माळी तसेच शाखेतील पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक यांच्या उपस्थितीत झाला.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेना शाखा क्र. 201 च्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन विधानसभा संघटिका श्रद्धा जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी शाखाप्रमुख हमीद शेख, शाखा संघटिका सरिता मांजरे, मयूर कांबळे, विशाल जाधव यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेना पक्षाच्या वतीने मालाडमध्ये पैलासधाम मोक्ष रथाचे लोकार्पण विभागप्रमुख अजित भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले. हा उपक्रम शाखा क्रमांक 46 चे शाखाप्रमुख कैलास कणसे यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आला आहे. यावेळी विधानसभा संघटक गणेश गुरव, विधानसभा संघटक मीना करांडे, उपविभागप्रमुख दीपक मोरे, शाखा संघटक हेमा म्हात्रे, शाखाप्रमुख संजय सोनावणे, सतीश गावडे आदी उपस्थित होते.