शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यभरात सामाजिक उपक्रम

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष 23 जानेवारीपासून सुरू झाले आहे.  त्यानिमित्त शिवसेनेसह विविध सामाजिक संस्थांच्या वतीने मुंबईसह राज्यभरात रक्तदान शिबीर, वैद्यकीय शिबीर रुग्णांना फळवाटप अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

टपाल विभाग स्थानीय लोकाधिकार समितीच्या वतीने रक्तदान शिबीर जीपीओ येथे आयोजित करण्यात आले होते. शिवसेना उपनेते राजपुमार बाफना यांनी उपस्थित राहून या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. समितीचे समन्वयक सुधाकर नर, सह कार्याध्यक्ष विजयानंद पेडणेकर, अजित परब, अजित पेडणेकर,  सुजित राणे, संदेश शिरसाट आदी यावेळी उपस्थित होते.

मुंबई विद्यापीठाच्या श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्राच्या वतीने फोर्ट कॅम्पस येथील सभागृहात व्याख्यान आणि व्यंगचित्र कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यक्रमाला विविध महाविद्यालयांचे तीनशेहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी व्याख्याते प्रा. डॉ. जयंत पुळकर्णी व सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार संजय मिस्त्राr यांचे ‘फटकारे’ पुस्तक देऊन युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी स्वागत केले. अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुनील पाटील, डॉ. नीलेश सावे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी शिवसेनाप्रमुखांची सुबक रांगोळी विलास रहाटे यांनी साकारली.

आर.सी.एफ. कर्मचारी सेनेच्या कार्यालयामध्ये शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर युनियनचे अध्यक्ष, शिवसेना सचिव विनायक राऊत, कार्याध्यक्ष विलास पोतनीस यांच्या आदेशानुसार मानखुर्दच्या चिल्ड्रन एड सोसायटीतील अनाथाश्रमात खाऊ वाटप केले. कर्मचारी सेनेचे सरचिटणीस दत्तात्रय परब, स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस महाजन, जे. पी. सिंग, युनिट सेव्रेटरी नीलेश गांवकर, विवेक कांडारकर, सुयोग हाडवळे, जीवन भोईर, रवींद्र भालेकर, संजय वडाळ, हनुमंत मोती, करुणाकरण, लोचन माळी यावेळी उपस्थित होते.

राजावाडी रुग्णालयात शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शिव आरोग्य सेनेचे मुंबई जिल्हा सहसमन्वयक प्रकाश वाणी, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष दोशी, अधिसेविका चंदन, विशाखा पायनवार, झोरे, नंदकिशोर लाळगे, विकास उतेकर, नीलेश उपाध्ये, विजय चपटे, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे पदाधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

जोगेश्वरी पूर्व येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर रुग्णालयातील रुग्णांना शिवसेना चित्रपट सेनेच्या वतीने फळ वाटप करण्यात आले. सरचिटणीस संग्राम शिर्पे, बाळा साटम, संजय कदम, विजय परब, उपाध्यक्ष दिलीप दळवी, सचिव गिरीश विचारे, सुरेश सालियन, स्नेहा साटम, योगिता धुवाळी आदी यावेळी उपस्थित होते.

शिवसेना शाखा क्र. 22 तर्फे कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात विभागप्रमुख संतोष राणे, विभाग संघटक मनाली चौकीदार यांच्या हस्ते रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. विधानसभा समन्वयक प्रदीप वस्त, विधानसभा प्रमुख सुषमा कदम, विधानसभा संघटक सुवर्णा प्रसादे, सीमा लोकरे, अभिषेक शिर्पे, राजपुमार पवार, रेखा कदम, महेश गुप्ता, छाया डोयले, नरेंद्र काळे, चेतन गीत, हनुमंत शेडगे, लक्ष्मण राणे, प्रकाश सैतावडेकर, राजेश दरडे, मोहन भोसले, निकिता कांबळे, मयूरी पोस्टुरे, श्रद्धा अभाणे आदी उपस्थित होते.

परळ येथील के. ई. एम. रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले. हा उपक्रम शिवसेना सचिव सुधीर साळवी आणि शिवडी विधानसभेचे आमदार अजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रभाग क्र 204 चे नगरसेवक किरण तावडे यांच्या विशेष पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाखा संघटक कांचन घाणेकर तसेच शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.