
पंढरपूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम बुधवार दि. 8 रोजी पार पडला आहे. विविध प्रभागांमधील जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. 36 जागांपैकी 18 जागांवर महिला तर 18 जागांवर पुरुषांना निवडणूक लढवता येणार आहे
प्रांताधिकारी सचिन इथापे, मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली. नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिला हे आरक्षण पडले आहे. 18 प्रभागांचेही आरक्षण जाहीर झाले आहे. 36 जागांपैकी 18 जागांवर महिला तर 18 जागांवर पुरुषांना निवडणूक लढवता येणार आहे. आरक्षण जाहीर झाल्यामुळे सर्व राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी केली जात आहे. तर इच्छुकांनी कंबर कसली कामाला सुरुवात केली आहे.
पंढरपूर नगरपरिषदेच्या एकूण 18 प्रभागांपैकी प्रत्येक प्रभागात ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोन जागांसाठी म्हणजेच 36 जागांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. काही प्रभागांमध्ये अनुसूचित जाती, मागासवर्गीय प्रवर्ग तसेच महिलांसाठी आरक्षण ठेवण्यात आले आहे. तर प्रत्येक प्रभाग सर्वसाधारण गटासाठी खुले ठेवण्यात आले आहेत. या सोडतीनंतर आता नगरपरिषदेच्या निवडणुकीची रंगत अधिक वाढली आहे. इच्छुक उमेदवार आपल्या प्रभागातील आरक्षणानुसार तयारीस लागले आहेत.
प्रभाग क्र. 1 नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला.
प्रभाग क्र. 2 नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला.
प्रभाग क्र. 3 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण.
प्रभाग क्र. 4 अनुसूचित जमाती, सर्वसाधारण महिला.
प्रभाग क्र. 5 नागरिकांचा मागास प्रवर्ग-महिला, सर्वसाधारण.
प्रभाग क्र. 6 अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला.
प्रभाग क्र. 7 सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण.
प्रभाग क्र. 8 सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण.
प्रभाग क्र. 9 अनुसूचित जमाती महिला, सर्वसाधारण.
प्रभाग क्र. 10 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण.
प्रभाग क्र. 11 अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण.
प्रभाग क्र. 12 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण.
प्रभाग क्र. 13 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण.
प्रभाग क्र. 14 अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण.
प्रभाग क्र. 15 नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला.
प्रभाग क्र. 16 नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला.
प्रभाग क्र. 17 अनुसुचित जाती, सर्वसाधारण महिला.
प्रभाग क्र. 18 नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला.