
>> योगेश जोशी
मार्च महिन्यात सूर्यग्रहणाला महत्त्वाचा अद्भूत योद बनत आहे. या सूर्यग्रहाणाच्या दिवशीच शनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. असा योग तब्बल 100 वर्षांनी जूळून येत आहे. या योगाचे काही राशींना शुभफल मिळणार आहे.
शनि राशीपरिवर्तनामुळे कर्क आणि वृश्चिक राशींची अडीची संपत असून सिंह आणि धनू राशींची अडीची सुरू होणार आहे. तर मकर राशीची साडेसाती संपत असून मेष राशीची साडेसाती सुरू होत आहे. या राशीपरिवर्तनामुळे सिंह आणि धनू राशींना काही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तर कर्क आणि वृश्चिक राशींना अडीची संपत असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचसोबत कुंभ राशींचा साडेसातीचा अखेरचा टप्पा असल्याने त्यांच्या अडचणी आधीपेक्षा कमी होणार आहे. तर मीन राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. हा या राशीसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. तसेच मेश राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा असल्याने त्यांचा अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
शनी राशी परिवर्तनाच्या दिवशीच सूर्यग्रहणही होत आहे. तब्बल 100 वर्षांनी असा योग जूळून येत असल्याने त्याचा अनेक राशींना फायदा होणार आहे. चंद्र किंवा सूर्यग्रहण फारसे शुभ मानले जात नाही. मात्र, काही राशींना याची शुभ फळे मिळतात. तसेच ही दोन्ही ग्रहणे हिंदुस्थानातून दिसणार नसल्याने त्याचा ग्रहणकाळ किंवा सूतक पाळण्याची गरज नाही.
मार्च महिन्यात 29 मार्च रोजी आंशिक सूर्यग्रहण होणार आत आहे आणि त्याच दिवशी शनि कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. सूर्यग्रहण आणि शनीच्या संक्रमणाचा योग तब्बल 100 वर्षांनंतर जूळून आला आहे. हा एक अत्यंत दुर्मिळ योगायोग आहे. शनीचा राशीबदल आणि त्याच दिवशी होणारे सूर्यग्रहण यामुळे काही राशींचे भाग्य फळफळणार आहे.
हा योग मिथुन राशीसाठी अनेक सकारात्मक बदल घेऊन येत आहे. शनिबदल आणि सूर्यग्रहण या राशीला शुभपल देणारे आहे. मनात ठरवलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल आणि बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच आर्थिक परिस्थिती मजबूत होणार असून आर्थिक लाभाच्या घटना घडणार आहेत. तसेच, मालमत्ता, वाहन किंवा घर खरेदी आणि चैनीच्या वस्तूंच्या खरेदीचे योग आहेत.
शनिबदल आणि सूर्यग्रहणाचे तूळ राशींनाही शुभफळ मिळणार आहे. प्रलंबित कामे प्रयत्न केल्यास यशस्वी होणार आहेत. तसेच हा काळ गुंतवणुकीसाठीही चांगला आहे. याआधी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तूश राशींचा आत्मविश्वास वाढणार असल्याने व्यवसाय वाढीसाठी अनुकूल काळ आहे. तसेच शनी सहाव्या स्थानात जात असल्याने हितशत्रूंवर मात करणे शक्य होणार आहे.
धनु राशीला आर्थिक समृद्धी येण्याची शक्यता आहे. धनू राशीची सर्व कर्जातून मुक्तता होण्याची शक्यता आहे. शनी चतुर्थ स्थानात जात असल्याने कौटुंबिक संबंध आनंदाचे असतील. या काळात उत्पन्नवाढीची आणि बदली, बढतीचे योग आहेत. मुलांकडून आणि कटुंबीयांकडून शुभसमाचार मिळण्याची शक्यता आहे.
मीन राशीच्या लोकांसाठीही हा योग शुभफलदायक असेल. मीन राशीच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रातील ताणतणाव कमी होऊन मनासारखे काम मिळण्याचे योग आहे. पदोन्नतीच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच व्यवहार आणि अनेक गोष्टी यशाच्या टप्प्यात आल्याने आर्थिल लाभाचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे.