सोनम कपूरने शेअर केला नवजात बाळाचा पहिला फोटो; टीमचेही मानले आभार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवुडची ‘स्टाईल आयकॉन’ अभिनेत्री सोनम कपूर आणि व्यावसायिक आनंद आहुजा 29 मार्च 2026 रोजी दुसऱ्यांदा आई-बाबा झाले. सोनमने एका गोंडस मुलाला जन्म दिला. ही आनंदाची बातमी सोनमने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट करून चाहत्यांसोबत शेअर केली होती. सोनमने तिच्या नवजात मुलाचा पहिला फोटो सोशल मिडियाद्वारे चाहत्यांना दाखवला आहे.

या पोस्टमध्ये, सोनम कपूरने तिच्या बाळाचा एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टसह सोनमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पतीसोबतच्या एका संयुक्त पोस्टमध्ये म्हटले की, माझ्या बाळाचा जन्म होताना माझ्यासोबत जे जे होते त्या सर्व टीममधील सदस्यांचे आभार…

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonam A Kapoor (@sonamkapoor)

सोनमने सोशल मीडिया हँडलवर, प्रसूतीमध्ये मदत करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानणारी एक विस्तृत पोस्ट लिहिली आहे. तसेच सोनमचा आणि नवजात बाळाचा एक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये सोनमने बाळाला आपल्या छातीशी धरले आहे. तिने या दुसऱ्यांदा आई झाल्याच्या क्षणांना विलक्षण असल्याचेही म्हटले आहे.