24 तासांत 11,707 पुलअप्स

24 तासांत सर्वाधिक पुलअप्स करण्याचा विश्वविक्रम दक्षिण कोरियाचा जवान ओ योहान याने आपल्या नावावर केला आहे. त्याने 24 तासांत 11, 707 पुल अप्स केले. हा पराक्रम योहानने 28 आणि 29 सप्टेंबर रोजी केला होता. याबद्दल नुकतेच त्याचे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये दाखल झाले. योहानने या यशाचे श्रेय आपल्या सैनिकी शिस्तीला दिले. विशेष म्हणजे हा विश्वविक्रम करताना योहान आणखीही पुल अप्स करू शकत होता. मात्र 11,707 वर तो थांबला आणि त्याने आपल्या विशेष दलाच्या युनिटला म्हणजे 707 स्पेशल मिशन ग्रुपला विश्वविक्रम समर्पित केला. याआधीही योहानने आठ हजारांहून अधिक पुल अप्स करून विक्रम केला होता. मात्र तो रेकॉर्ड आठवड्याभरातच दुसऱयाने तोडला. त्यानंतर पुन्हा एकदा विश्वविक्रमाचा चंग योहानने बांधला आणि त्यात तो यशस्वी झाला.