जम्मू, उधमपूर ते दिल्ली रेल्वेच्या विशेष गाडय़ा

सीमावर्ती भागात राहणाऱ्या रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यासाठी रेल्वेने शुक्रवारी जम्मू, उधमपूर ते नवी दिल्ली तीन विशेष गाडय़ा सुरू केल्या आहेत. 12 अनारक्षित आणि 12 आरक्षित डब्यांची एक विशेष ट्रेन सकाळी 10.45 वाजता जम्मूहून नवी दिल्लीसाठी रवाना झाली. दुसरी 20 डब्यांची वंदे भारत ट्रेन दुपारी 12ः45 वाजता उधमपूरहून जम्मू आणि पठाणकोटमार्गे नवी दिल्लीसाठी रवाना झाली. तिसरी विशेष 22 डब्यांची आरक्षित ट्रेन संध्याकाळी 7 वाजता जम्मूहून नवी दिल्लीसाठी रवाना झाली आहे.