
जगभरात धुमाकूळ घालणारी कोरियन वेब सीरिज स्क्विड गेमचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून निर्मात्यांनी प्रदर्शनाच्या तारखेची घोषणासुद्धा केली आहे. या वेब सीरिजचा अखेरचा आणि तिसरा भाग पुढील महिन्यात 27 जूनला नेटफ्लिक्सवर येणार आहे. या सीरिजमध्ये ली जंग-जे, ली ब्युंग-हून आणि पार्प ह्ये-सू हे दिग्गज स्टार्स आहेत. स्क्विड गेमचा पहिला भाग 2021 मध्ये आला होता. या सीरिजने अनेक रेका@र्ड मोडले असून नेटफ्लिक्सवर सर्वात जास्त पाहिलेली वेब सीरिज ठरली आहे.