
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्कल बेस्ड अधिकारी पदांच्या एकूण 2964 पदांसाठी भरती केली जात आहे. महाराष्ट्रात एकूण 267 पदे भरली जाणार आहेत. हैदराबाद 233, भोपाळ 232, जयपूर 218, बंगळुरू 289 पदे भरली जाणार आहेत. कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण असलेल्या पात्र उमेदवाराने 29 मे 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत. उमेदवाराकडे शेड्युल्ड कमर्शियल बँक किंवा प्रादेशिक ग्रामीण बँकेतील ऑफिसर पदांचा किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. उमेदवाराने ज्या राज्यातून अर्ज भरला आहे, त्याला त्या ठिकाणची स्थानिक भाषा बोलता येणे आवश्यक आहे.