स्टेट बँक ऑफ इंडियात 33 पदांसाठी भरती

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) मध्ये एकूण 33 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरअंतर्गत ही पदे भरली जाणार असून यात डेप्युटी मॅनेजर, असिस्टेंट व्हाईस प्रेसिडेंट आणि जनरल मॅनेजर या पदांचा समावेश आहे. उमेदवारांचे वय 25 ते 35 वर्षांपर्यंत असायला हवे. पात्र उमेदवार 7 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज भरू शकतात. याआधी अर्ज भरण्यासाठी 31 जुलै ही डेडलाईन होती. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती बँकेची अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर देण्यात आली आहे.