एकात्मिक बीएड प्रवेशासाठी 20 जुलैला सीईटी

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) लागू केलेल्या चार वर्षीय एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या (आयटीईपी) प्रवेशाकरिता राज्याच्या सीईटी सेलकडून सीईटी घेतली जाणार आहे.

एनसीटीईने चार वर्षीय बीए/बीएस्सी-बीएड (एकात्मिक) हा अभ्यासक्रम बंद करून चार वर्षांचा आयटीईपी हा अभ्यासक्रम लागू केला आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता सीईटी आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (कॅप) राबविण्याची सूचना परिषदेने केली होती. त्यानुसार 20 जुलै रोजी ही सीईटी घेतली जाणार आहे. महा-बीए/बीएस्सी-बीएड-सीईटीकरिता 2 ते 15 जूनदरम्यान विद्यार्थ्यांनी अर्ज करायचे आहेत.